कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रिकॉशनरी डोस घेण्याचे आवाहन

कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रिकॉशनरी डोस घेण्याचे आवाहन

भंडारा, दि. 15 : कोविड-19 लसीकरणाचा आझादी का अमृत महोत्सव दिनांक 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) पर्यंत सर्व शासकीय आरोग्य संस्थेत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत कोविड-19 लसीकरण आझादी अमृत महोत्सवा दरम्यान 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा प्रिकॉशनरी डोस हा मोफत देण्यात येणार आहे.

कोविड-19 लसीकरण दुसरा डोसनंतर 6 महिने किंवा 26 आठवडे पुर्ण झालेल्या 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना प्रिकॉशनरी डोस हा मोफत देण्यात येत आहेत. तरी दिनांक 15 जुलै 2022 पासुन 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) पर्यंत सर्व शासकीय संस्थांमध्ये 18 वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांनी नजिकच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जाऊन प्रिकॉशनरी डोस घ्यावा,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केली आहे.