येत्या सोमवारी महिला लोकशाही दिन

येत्या सोमवारी महिला लोकशाही दिन

भंडारा, दि. 15 : महिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 वाजता जिल्हास्तरीय महीला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/ अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत मा. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करावा असे शासन निर्णयान्वये निर्देश दिलेले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरीता तक्रार अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शिवाजी क्रिडा संकूल, बस स्टॉप जवळ, भुविकास बँक भंडारा येथे उपलब्ध आहे.

जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करतांना अर्जासोबत मा. जिल्हाधिकारी यांना उद्देशुन अर्ज, तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्रमांक असल्यास प्रत, महिला लोकशाही दिनात न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक, आस्थापना विषयक, निवेदन स्वरूपाच्या तक्रारी स्विकारण्यात येणार नाहीत.