गडचिरोली पंचायत समितील 12 गणा करीता आरक्षण सोडत

गडचिरोली पंचायत समितील 12 गणा करीता आरक्षण सोडत

गडचिरोली, दि.08: गडचिरोली पंचायत समितीच्या 12 गणाच्या मतदारसंघामधील आरक्षणाची सोडत येत्या 13 जुलै 2022 रोजी काढली जाणार आहे. त्यात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील स्त्रियांच्या आरक्षणासह राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. त्याकरीता दुपारी 3 वाजता गोंडवाना कला केंद्र,पोटेगांव रोड,गडचिरोली येथे ही सोडत काढण्यात येणार आहे.

पंचायत समिती,गडचिरोली येथील 12 गणाकरीता आरक्षण सोडतीच्या सभेला संबंधीत नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन तालुका निवडणूक अधिकारी,तथा तहसिलदार, गडचिरोली यांनी केले आहे.