चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला रेन वॉटर हार्वेस्टींग अनुदान वाटप सोहळा   ५८ जलमित्रांनी स्वीकारला अनुदानाचा धनादेश

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला रेन वॉटर हार्वेस्टींग अनुदान वाटप सोहळा  

५८ जलमित्रांनी स्वीकारला अनुदानाचा धनादेश

चंद्रपूर १ जुन – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींग करून मोहिमेस सहकार्य करणाऱ्या ५८ जलमित्रांना रेन वॉटर हार्वेस्टींगचे अनुदान आज देण्यात आले. आयुक्त राजेश मोहिते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सर्व लाभार्थ्यांना अनुदानाचा धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आले.

रेन वॉटर हार्वेस्टींग केल्यावर मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येते. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे या दृष्टीने मनपाने पाऊले उचलली आहेत. या सर्व जलमित्रांनी मागील १ महिन्याच्या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग केले होते व त्यांना अनुदानही लवकर प्राप्त झाले आहे.

शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रम हाती घेण्यात आला आहे रेन वॉटर हार्वेस्टींगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मनपामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

याप्रसंगी उपस्थीत नागरीकांनी मनोगत व्यक्त करून पुर्वी वाया जाणारे पाणी आता भुगर्भात जिरविल्या जात असल्याबाबत समाधान व्यक्त केले. रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसवुन देणाऱ्या कंत्रादारांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या अनुदान वाटप सोहळ्यास अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील, सचिन माकोडे, नरेंद्र बोभाटे, राहुल पंचबुद्धे, नागेश नीत,प्रकाश इवनाते, शुभम वरघट, मीनल देवतळे, कमलाकर तिखट, साक्षी कार्लेकर, सुनील नामेवार, सुखदेव मोहीतकर तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.