सोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार? ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा सवाल

सोनिया,राहुल गांधी यांना अटक कधी होणार? ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा सवाल

मुंबई, दिनांक-३० जून २०२२ देशाला भष्ट्राचारामुक्त करण्याच्या दिशेने सरकारने आता तात्काळ पावले टाकत ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणातील दोषींना अटक करीत त्यांना तुरूंगात डांबावे,अशी आग्रही मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी केली.कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) प्रकृतीचे कारण देत चौकशी करीता हजर राहण्यासाठी वाढीव वेळ मागून घेतला आहे.तर, याच प्रकरणात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची ईडीने सातत्याने चौकशी केली आहे. मात्र,आता हा चौकशी नाट्याचा खेळ थांबवून भष्ट्राचाराच्या प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांना अटक करावी, असे पाटील म्हणाले.

कॉंग्रेस नेत्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली नाही, तर दिल्लीत आंदोलन करू, असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे. लवकरच यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून भष्ट्राचारासंबंधी पुरावे गोळा केले जात आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील महत्वाचे धागोदोरे ईडीच्या हाती लागले आहेत.डोटेक्स या शेल कंपनीने असोशिएट जर्नल्स लिमिटेडला टेकओवर करण्यासाठी यंग इंडियन ला निधी दिला होता.

एजेएलच्या ९० कोटींच्या कर्जाचे सेटलमेंट स्वरूपात कॉंग्रेसला यंग इंडियन कडून ५० लाख मिळाले होते.यानंतर एजेएल चे १०० टक्के शेअर यंग इंडियन ला हंस्तातरीत करण्यात आले होते. सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा असतान २०११ मध्ये यंग इंडियन ने एजेएल अधिग्रहण केले होते. यासंबंधी कॉंग्रेसने कशाप्रकारे ९० कोटी रुपये दिले, या व्यवहाराची चौकशी सोनिया यांच्याकडून केली जावू शकते. सोनिया आणि राहुल गांधी यांनी २०१० मध्ये यंग इंडिया नावाने कंपनी सुरू करीत दोन हजार कोटींची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असल्याने ईडीने पुन्हा तपास चक्रे फिरवली आहेत. शेल कंपनीच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचे प्रबळ पुरावे असतांना देखील या प्रकरणात अटक का करण्यात आलेली नाही? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.