आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रा

आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर विकसीत भारत संकल्प यात्रा
तहसिलदार, आरमोरी यांचे नागरीकांना लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.20: भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावे या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य / केंद्र शासीत प्रदेशाच्या सहकार्यांने माहे एप्रिल, मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जुन, ऑगष्ट 2018 या कालावधीत विस्तारील ग्रामस्वराज्य अभियान राबविले आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाहीत अशा लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने विकसीत भारत संकल्प यात्रा या नावाची देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडुन दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत आखण्यात आलेली आहे.
सदर मोहिमेमध्ये, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देणे, विविध विभागाचे स्टॉल लावुन शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांना देणे, नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करणे तसेच मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान व भारत विकसीत संकल्प यात्रा मोहिम हे कार्यक्रम समन्वयाने एकत्रित करून अमंलबजावणी करणेकरीता आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर पुढील प्रमाणे विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ग्रामपंचायत डोंगरसावंगी येथे दिनांक 21.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ -जि.प.शाळेसमोर डोंगरसावंगी. ग्रामपंचायत डोंगरगाव भु. येथे दिनांक 21.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ -जि.प.शाळेसमोर डोंगरगाव भु. ग्रामपंचायत सुकाळा येथे दिनांक 22.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ- जि. प. शाळेसमोर सुकाळा.
ग्रामपंचायत मोहझरी येथे दिनांक 22.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्रामपंचायत आवारात, मोहझरी. ग्रामपंचायत शिवणी बु. येथे दिनांक 23.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्राम पंचायत कार्यालय, शिवणी बु.
ग्रामपंचायत देलनवाडी येथे दिनांक 24.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ ग्राम पंचायत समोरील चौकात देलनवाडी. ग्रामपंचायत मानापुर येथे दिनांक 24.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्राम पंचायत कार्यालय समोर, मानापुर.
ग्रामपंचायत कुलकुली येथे दिनांक 25.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ ग्रामपंचायत समोरील पटांगण, कुलकुली. ग्रामपंचायत भाकरोंडी येथे दिनांक 25.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्रामपंचायत कार्यालय, भाकरोंडी.
ग्रामपंचायत जांभळी येथे दिनांक 26.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ जि.प. प्रा. शाळेसमोर, जांभळी. ग्रामपंचायत कोरेगांव रांगी येथे दिनांक 26.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्राम पंचायत समोर, कोरेगाव रांगी.
ग्रामपंचायत नरचुली येथे दिनांक 27.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ जि. प. प्रा. शाळेसमोर, नरचुली. ग्रामपंचायत कुरुंडीमाल येथे दिनांक 27.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्राम ग्राम पंचायत समोर, कुरुंडीमाल.
ग्रामपंचायत चुरमुरा येथे दिनांक 28.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ – जि. प. प्रा. शाळेसमोर, चुरमुरा., ग्रामपंचायत किटाळी येथे दिनांक 28.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – जि. प. शाळेसमोर, किटाळी., ग्रामपंचायत पिसेवडधा येथे दिनांक 29.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ – मातोश्री विद्यालय , पिसेवडधा.
ग्रामपंचायत बोरीचक येथे दिनांक 29.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – जि. प.शाळेसमोर , बोरीचक. ग्रामपंचायत सिर्सी येथे दिनांक 30.11.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ – खाजगी शाळेच्या प्रांगणात , सिर्सी., ग्रामपंचायत इंजेवारी येथे दिनांक 30.11.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – जि. प.शाळेसमोर, इंजेवारी., ग्रामपंचायत चामोर्शी माल येथे दिनांक 01.12.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ चौक परीसर , चामोर्शीमाल.
ग्रामपंचायत कोजबी येथे दिनांक 01.12.2023 रोजी दुपारी 2.00 ते सायं.5.00 वा. कार्यक्रम स्थळ – ग्रामपंचायत कार्यालय समोर , कोजबी., ग्रामपंचायत पळसगाव येथे दिनांक 02.12.2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वा. कार्यक्रम स्थळ- ग्रामपंचायत कार्यालय समोर, पळसगाव.

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसुल विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधीत दैनंदीन प्रश्न ताबडतोब निकाली काढण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनेचे लाभ नागरिक व शेतमजुरांना देण्यासाठी विकसीत भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, कृषी विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, पशुधन विभाग, पंचायत समिती व अंतर्गत विभाग, आरोग्य विभाग, उमेद, वनविभाग, बॅक विभाग, शिक्षण विभाग व विविध विभागाचे स्टॉल लावुन त्या माध्यमातुन विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या करीता विकसीत भारत संकल्प यात्रेचा बहुसंख्य नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार, आरमोरी, श्रीहरी माने यांनी केले आहे.