जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

भंडारा, दि. 2 : नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 3 जून 2022 रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल चालवणे उपयुक्त आहे. याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. साधे, परवडणारे स्वच्छ  ,टिकाऊ वाहतुकीचे साधन म्हणून तरूणांना शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी स्टेडीयम येथून सायकल रॅलीची सुरवात होणार आहे. सायकल रॅलीचा शुभारंभ माजी उपाध्यक्ष, नगर परिषद आशु गोंडाणे, माजी नगरसेविका जयश्री बोरकर व जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या सायकल रॅलीत युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी केले आहे.