लाखांदुर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन

लाखांदुर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन

भंडारा, दि. 2 : अंतिम प्रभाग रचनेवर प्रभाग निहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी जागा राखून ठेवल्यानंतर अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांच्या जागांचे आरक्षण सोडत निश्चित करावयाचे असल्याने लाखांदुर तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतमधील मतदार म्हणून पात्र असलेल्या ज्या ग्रामस्थांची विशेष सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असेल त्यांनी नेमून दिलेल्या तारखेला सभेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक देविदास पाथेाडे यांनी कळवले आहे.

तिरखुरी, पाउलदवना, खैर/पट, राजनी, जैतपुर, चिकना, साखरा, पाचगांव, चप्राड, नांदेड, विरली खुर्द, कुडेगांव, खैरणा, आथली यांची विशेष सभा संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी 4 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता आहे. तर सोनेगाव/घोडे, खैरी/घर, विहीरगांव, करांडला, खोलमारा, दिघोरी/मोठी, तावशी, पालेपेंढरी, मडेघाट, किरमटी, ईटान, डांबेविरली, मोहरणा, आसोला यांची विशेष सभा 4 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता आहे.

पेंढरी, बोथली, परसोडी/नाग, ढोलसर, बारव्हा, सरांडी बुज, मानेगाव/ बोर, मांढळ, पिंपळगांव /को., दोनाड, ओपारा, पाहूणगांव, गवराळा, दहेगांव दिनांक 6 जून 2022 रोजी 11 वाजता आहे. तर  हरदोली, तई /बुज., भागडी, विरली.बुज, धर्मापूरी, मुरमाडी, मासळ, रोहणी, डोकेसरांडी यांची दिनांक 6 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजता आहे.