शासकीय वसतिगृहांसाठी इच्छुक इमारत मालकाकडून प्रस्ताव आमंत्रित

शासकीय वसतिगृहांसाठी इच्छुक इमारत मालकाकडून प्रस्ताव आमंत्रित

 

भंडारा, दि. 21 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुलींचे शासकीय वसतिगृह, भंडारा करीता 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलांचे शासकीय वसतिगृह, भंडाराकरीता 100 विद्यार्थी क्षमतेची एक अशा एकूण दोन वसतिगृहांकरीता खाजगी इमारत भाड्याने घ्यायची असुन त्यामध्ये कार्यालय, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, भांडारगृह, ग्रंथालय कक्ष, स्वच्छतागृहे, क्रिडांगण ईत्यादी बाबींची किमान पात्रता निकष पुर्ण करणाऱ्या भंडारा नगरपरिषद क्षेत्र किंवा तीन किलोमीटरच्या लगतच्या परिसरामधील ईच्छुक इमारत मालकाकडून इमारत भाडयाने देण्याकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

 

इमारत भाडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या भाडे निश्चितीच्या अधीन राहील. इतर संपूर्ण माहिती व प्रस्तावाचा नमूना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. तरी इच्छुक इमारत मालकांनी आवश्यक कागदपत्रासह परिपुर्ण प्रस्ताव एक महिन्याच्या आत कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे समाज कल्याण कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.