लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळेचे आयोजन  नऊ फेब्रुवारीला

लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळेचे आयोजन  नऊ फेब्रुवारीला

 भंडारा दि. 1 : शासन आपल्या दारी या कार्यक्रमाप्रमाणेच 11.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सिव्हील लाईन, भंडारा येथे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर  यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

चर्मकार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी चर्मकार समाजाची कार्यशाळा व चर्मकार बांधवांना महामंडळाच्या योजनांची माहिती, योजनांचे माहितीपत्रके व इच्छूक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. एम.सी.ई.डी. मार्फत महाराष्ट्रामध्ये 25,000 युवक-युवतींना निवासी व अनिवासी प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. त्याकरिता चर्मकार युवक-युवतींची नोंदणी करावयाची आहे. करिता 9 फेब्रुवारीला सामाजिक न्याय भवन सभागृह, भंडारा येथे सकाळी  11.00 वा. भंडारा जिल्हयातील सर्व युवक-युवतींनी व चर्मकार बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती कल्पना भंगाळे यांनी केले आहे.