सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत चे शिवाजी महाराज चौकात विद्युत रोषणाई होईल का…?

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत चे शिवाजी महाराज चौकात विद्युत रोषणाई होईल का…?

सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत परिसरातील व सिंदेवाही तालुक्यातील एकमेव मुख्य चौक म्हणजे शिवाजी महाराज चौक या मुख्य चौकातुन तालुक्यातील संपूर्ण गाव खेड्याला जाणारी रस्ते जो़डली गेली आहेत. संपूर्ण प्रशासकिय कार्यालये, पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय,बस स्थानक, पेट्रोल पंप, बाजार चौक अशी महत्वाची रस्ते गेले आहेत. शिवाजी महाराज चौकातील विद्युत रोषणाईसाठी नगरपंचायतला आर्थिक नियोजन करता आले नाही की दुर्लक्ष केले जात आहे.

मुख्य चौक असल्याने वर्दळ जास्ती असते परंतु येथे गतिरोधक (स्पिड ब्रेकर) आजपर्यंत लावण्यात आले नाहीत. या मुख्य चौकात गतिरोधक नसल्याने अनेकदा अपघात झाले आहेत एवढंच नाही तर चौकातील लावलेल्या झेंड्यावर ट्रक सुद्धा चढविले गेल्याचे प्रकार अनेकदा घडले आहे.
याच मुख्य चौकातून तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तर संपुर्ण शासकीय कर्मचारी कामाला येजा करतात.

नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही प्रशासन या गंभीर समस्या कडे लक्ष घालतील का… व शिवाजी महाराज चौकातील विद्युत रोषणाई आणि गतिरोधक बसविण्यासाठी प्रयत्न करतील का..
अशे अनेक शंका व आरोप नगरपंचायत प्रशासनावर सिंदेवाही लोनवाही परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे