क्रीडा प्रबोधिनीमध्ये कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

क्रीडा प्रबोधिनीमध्ये कौशल्य चाचणीद्वारे निवासी

व अनिवासी प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 4 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रवेशाकरीता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. इच्छुक खेळांडूनी जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे संपर्क करून विहित वेळेत अर्ज सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी कळविले आहे.

आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, ॲथलेटीक्स, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल-टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक्स या खेळातील उदयन्मुख खेळाडूंसाठी क्रीडा प्रबोधिनीसाठी जे खेळाडू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. या  प्रवेश प्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी व कौशल्य चाचणीसाठी राज्यस्तरावर सहभागी झालेले 19 वर्षाच्या आतील खेळाडू सदर खेळनिहाय सरळ व कौशल्य चाचण्यांचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तर कार्यक्रम करण्यात येत आहे.

निवासी व अनिवासी प्रवेशाकरीता कौशल्य चाचण्यांचे आयोजन विभागस्तरावर व राज्यस्तरावर करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर 9 ते 11 मे दरम्यान यासाठी प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे सादर करावेत.  विभागस्तर चाचण्यांचे आयोजन दि. 19 ते 20 मे 2022 विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर,नागपूर येथे होतील तर राज्यस्तरीय चाचण्या दि.30 ते 31 मे दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे होतील.