विमा संरक्षणाच्या लाभासाठी पीक नुकसानीची माहिती 72 तासात विमा कंपनीला द्यावी   -जिल्हा कृषी अधिक्षक

विमा संरक्षणाच्या लाभासाठी पीक नुकसानीची

माहिती 72 तासात विमा कंपनीला द्यावी

                                              -जिल्हा कृषी अधिक्षक

भंडारा, दि. 15 :  मार्च महिन्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवेळी गारपीट, पाऊस होण्याची शक्यता आहे. तरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधीला कळवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केले आहे.

शेतकऱ्यांनी यासाठी नुकसानग्रस्त पिकांच्या फोटोसह सूचना संबंधित पिक विमा कंपनीला देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा इ-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा, कृषी विभागाचे कार्यालय- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी या पर्यायांचा वापर करावा.

एच.डी.एफ.सी एर्गो इन्शुरन्स कॉम ही विमा कंपनी जिल्ह्यासाठी कार्यरत आहे. तालुक्यानिहाय विमा प्रतिनीधीचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.

भंडारा 9552235391 सचिन शेटे sachinshete@gmail.com, मोहाडी 7770043035 संतोष बोपचे santoshbopche65@gmail.com, तुमसर 9543314804 संजेश उके sanjuukey2015@gmail.com, पवनी 8805493858 अतुल फुले fuleatul22@gmail.com, साकोली 8379835124 विवेक टिकेकर vivek.tikekar@gmail.com, लाखनी 7770058571 अनुराग गजभिये pmfby.maharashtra@hdfcergo.com, लाखांदुर 9473573977 वेंकटेश येवले  venkteshewle257@gmail.com, जिल्ह्यासाठी HDFC Ergo Gen. Insu. Company ही विमा कंपनी असून कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18002660700 असा आहे.