आयकॉनिक व पेन्शन सप्ताहानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम कामगारांना दिली योजनांची माहिती

आयकॉनिक व पेन्शन सप्ताहानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

  • कामगारांना दिली योजनांची माहिती

भंडारा, दि. 15 : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फ 7 ते 13 मार्च दरम्यान जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताह प्रधानमंत्री व श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत पेन्शन सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला .

            भंडारा जिल्ह्यातील विविध बांधकाम कामाच्या ठिकाणी भेटी देऊन कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना, बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण तसेच लाभाबाबतची माहिती बांधकाम कामगारांना देण्यात आली. कामगारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याविषयी व  www.mahabocw.in  या संकेतस्थळाविषयी विस्तृत माहिती कामगारांना सांगण्यात आली. असंघटित क्षेत्रात कार्यरत सर्व कामगारांकरिता राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने अंतर्गत (PMSYM) या पेन्शन योजनेची लाभाबाबतची माहितीही त्यांना सप्ताहात देण्यात आली.

ई-श्रम (e-SHRAM Portal) URL:eshram.gov.in या संकेतस्थळावर आपले आधार कार्ड, बँक पासबुक व भ्रमणध्वनी क्रमांक सोबत घेवून नजीकच्या नागरी सुविधा केंद्र (CSC) किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र, भंडारा येथे भेट देऊन पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमात अपर कामगार आयुक्त, नि. पा. पाटणकर यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक कामगार आयुक्त, रा. मो. धूर्वे यांच्या नियंत्रणाखाली कार्यालयातील गु. रा. पंधरे, सरकारी कामगार अधिकारी, मनीषा खंडाईत, अभिजीत इंगळे, प्रकाश जांभुळकर, अनंता सोनकुसरे, संदीप फाले, कुणाल ढवळे व इतर कर्मचारी हे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होते.