आरटीई अतंर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

आरटीई अतंर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि. 7 मार्च :बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 191 शाळांमधील 1506 जागांकरिता दि. 18 फेब्रुवारी ते 10 मार्च 2022 या कालावधीत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तरी, इच्छुक पालकांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावे. सोडत लॉटरी लागल्यानंतर निवडीबाबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश प्राप्त होतील. यासंदर्भात पालकांना काही अडचणी आल्यास संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेन्द्र लोखंडे यांनी केले आहे.