शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या  विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या

 विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 9 : राज्यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाव्दारे शासकीय वसतीगृह योजना कार्यान्वित आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेकरीता https://swayam.mahaonline.gov.in या प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करावे. अर्ज सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही वसतीगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज केलेले नाही, त्यांनी तात्काळ सदर दिनांकापर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी संबंधित वसतीगृह गृहपाल किंवा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी कळविले आहे.