चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये महापौरांच्या उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृती


चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये महापौरांच्या उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृती

चंद्रपूर  |  शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त झोन क्र.1 येथील लक्ष्मीनगर, वडगांव येथे महापौर राखीताई कंचर्लावार यांच्या उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून २ हजार ५०० रुपये आणि वेकोलिच्या सीएसआर फंडातून २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यावर लक्ष्मीनगर, वडगांव येथे इंजिनीयर शुभम वरघट व साक्षी कार्लेकर यांनी नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल माहिती सांगितली. तसेच झोन क्र.1 येथील राम नगर येथे झोन सभापती छबुताई वैरागडे यांच्या उपस्थितीत रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमात माझी वसुंधराची शपथ घेण्यात आली.