राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा, दि. 14 : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही/एड्स विषयी युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने 20 जानेवारी 2022 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ‘उच्च माध्यमिक (वर्ग 8,9 व 10) शाळेतील विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्स संक्रमणाचे कोणते मार्ग आहेत याविषयी शिक्षण देणे योग्य की अयोग्य’ या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या वादविवाद स्पर्धेत एका गटामध्ये 3 ते 4 विद्यार्थी असतील व इतर 2 ते 4 गटांशी चर्चा करतील. स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकाचे नाव कार्यरत आयसीटीसी समुपदेशक/ प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचे व्हॉट्स ॲप किंवा dapcubhandara@gmail.com या ई-मेलवर 18 जानेवारी 2022 पर्यंत पाठविण्यात यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.