पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज मागविले

पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज मागविले

भंडारा, दि. 23 :  सन 2021-22 या सत्रातील 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज सादर करतांना जातवैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, परीक्षेचे गुणपत्रक, महा. बोनाफाईड प्रमाणपत्र, बँक खाते आधार संलग्न असल्याचा पुरावा, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी जिथे राहतो त्याबाबत पुरावा ( खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र यासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन जिल्हा परिषद चौक, भंडारा या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.