निवडणुकीच्या अनुषंगाने 17, 18 व 19 जानेवारी रोजी मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

निवडणुकीच्या अनुषंगाने 17, 18 व 19 जानेवारी रोजी मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा, दि. 14 : जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपंचायतीमधील निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान व मतमोजणी कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणे. याअनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील ज्या क्षेत्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आहे. त्या क्षेत्रातील देशी/ विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्ती  17 जानेवारी मतदानापूर्वीचा एक दिवस, 18 जानेवारी मतदानाचा दिवस आणि 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करुन अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे सदर आदेशात नमुद केले आहे.