17 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

17 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर दि. 13 जानेवारी : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माहे जानेवारी महिन्याच्या तिसरा सोमवार दि.17 जानेवारी 2022 रोजी येत असल्याने कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर दि.10 जानेवारी पासुन निर्बंध लावण्यात आले आहे. तरी, सदर महिला लोकशाही दिनाचे दि.17 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असून  8329651110 या दुरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲप, मॅसेज, तसेच व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क तसेच तक्र्रार अर्ज करावे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.