वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

एफडीसीएम सिंदेवाही वन परिक्षेत्रातील जाटलापूर (मोठा) कंपार्टमेंट क्रमांक-168 (गडमोशी बिट) येथे वाघाच्या हल्ल्यात 50 वर्षीय गुराखी जखमी झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही येथील सिंदेवाही येथील दिलीप भिवाजी रेपकवार (50) , गुरे चरण्यासाठी जंगलाजवळ गेला.वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला करत त्याला जखमी केले.
दरम्यान, वामन बोरकर जाटलापूर व सचिन बोरकर जाटलापूर दुचाकीवरून जाटलापूर (मोठा) या गावी जात असताना वाघापासून काही अंतरावर दिलीप रेपकवार गंभीर जखमी झाल्याचे दिसले.
त्यांनी आरडाओरड करत जखमी दिलीप रेपकवार यांना वाघाच्या तावडीतून बाजुला केले व त्यांनी दुचाकीवरून तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी आणले.
सिंदेवाही येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ.बी.एम.कुलसंगे यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी झाल्याने शासकीय रूग्णालय चंद्रपूर येथे हलविले.
व्ही.पी.धुर्वे, एफडीसीएम वनविभाग सिंदेवाही यावेळी उपस्थित होते.