७१ गोवंशीय मुकाट जनावराची सुटका एकुण ८ चारचाकी वाहने जप्त आणि १४ आरोपी अटकेत

गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या विरुध्द धडक मोहीम ७१ गोवंशीय मुकाट जनावराची सुटका एकुण ८ चारचाकी वाहने जप्त आणि १४ आरोपी अटकेत

चंद्रपूर जिल्हयातुन अवैध गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी दिनांक 18/08/2023 रोजी जिल्हयात ठिकठिकाणी विशेष नाकेबंदी राबवुन केलेल्या धडक मोहिमेत पोलीस स्टेशन शेगांव (बु.), पोलीस स्टेशन कोठारी, गोंडपिपरी आणि पोंभुर्णा हद्दीत प्रभावी नाकेबंदी दरम्यान गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या एकुण 8 वाहनांविरुध्द कार्यवाही करुन 4 गुन्हयाची नोंद केली असुन त्यात एकुण नग 71 मुकाट गोवंशीय जनावरांची सुटका करुन एकुण 14 आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.

1) पोलीस स्टेशन शेगांव हद्दीत वरोरा ते चिमुर रोड वरील मौजा खातोडा रोडवर नाकेबंदी दरम्यान महिन्द्रा पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 26 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जातांना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे (1) बिलाल जाकीर कुरेशी वय 18 वर्ष रा.भद्रावती ( 2 ) अब्दुल नाजीम अब्दुल कुरेशी वय 28 वर्ष, (3) रितीक सावंत मेश्राम वय 23 वर्ष, (4) राजेंद्र भाऊराव सोयाम वय 55 वर्ष आणि ( 5 ) नेहाल राजेंद्र सोयाम वय 26 वर्ष चारही रा. वरोरा यांना अटक करुन त्यांच्या ताब्यात महिन्द्रा पिकअप क. MH34-BG-1632 किंमत 6,00,000/- रुपये, पायलटींक करीता वापरलेली मोटार सायकल क. MH34-BL-5313 किंमत 30,000/- रुपये आणि 26 नग गोवंशीय जनावरे किंमत 3,29,000/- रुपये असा एकुण 9,59,000 /- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. एस

2) पोलीस स्टेशन कोठारी हद्दीत मौजा देवई फाटा रोडवर नाकेबंदी दरम्यान पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 08 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जात असतांना मिळुन आल्याने सदर वाहन पिकअप क. MH34 – AK-4148 किंमत 3,00,000/- रुपये आणि 08 नग गोवंशीय जनावरे किंमत 80,000/- रुपये असा एकुण 13,80,000 /- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.