अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींच्या प्रशिक्षणाकरीता नामांकित संस्थेकडून प्रस्ताव आमंत्रित

अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींच्या प्रशिक्षणाकरीता

नामांकित संस्थेकडून प्रस्ताव आमंत्रित

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर कार्यालयाअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्पांतर्गत अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना वाहन चालक प्रशिक्षण, गोंडी भाषा स्पीकिंग कोर्स, एम.एस.सी.आय.टी व कंप्यूटर टायपिंग आदी प्रशिक्षण देण्याकरिता नामांकित संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

इच्छुक संस्थांनी दि. 7 जानेवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून प्रस्ताव सादर करावेत. विहित कालावधीमध्ये अर्ज सादर न केल्यास त्याचा विचार केल्या जाणार नाही. आवेदन अर्ज कार्यालयात उपलब्ध असून अर्जाची झेरॉक्स प्रत चालणार नाही, असे अर्ज रद्द करण्यात येतील. तरी, इच्छुक संस्थांनी अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे, प्रकल्प अधिकारी के.ई.बावनकर यांनी कळविले आहे.