राज्य  लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर 20 ऑक्टोबरला जिल्हा दौ-यावर

राज्य  लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर 20 ऑक्टोबरला जिल्हा दौ-यावर

भंडारा, दि. 17: राज्य लोकसेवा हक्क आयुक्त अभय यावलकर 20 ऑक्टोबरला जिल्हा दौ-यावर येत असुन त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी भंडारा येथे सकाळी 11.30 वाजता आगमन. दुपारी 12 वाजता नियोजन सभागृहात  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याबाबत सर्व विभागप्रमुखांचा आढावा  घेतील. दुपारी 2.30 वाजता अधिनियमातंर्गत  उपविभागीय अधिकारी, भंडारा शहर व ग्रामीण यांची कार्यालयीन तपासणी करतील.त्यांनतर जिल्हा अधिक्षक, भुमि अभिलेखी  व गट विकास अधिकारी  पंचायत समिती भंडारा या कार्यालयांना भेट व तपासणी करतील. दुपारी 4 वाजता जिल्हयातील सेतु केंद्र  आणि आपले सरकार केंद्रास भेट, चर्चा व मार्गदर्शन करतील.