डॉक्टरांनी केली जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती

डॉक्टरांनी केली जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती  

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
चंद्रपूर, ता. ५ : शहरातील १ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोमवार, दि. ३ जानेवारीपासून जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि पालकांमधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी शहरातील डॉक्टरांनी जॅपनीज एन्सेफलाइटिस लसीसाठी जनजागृती केली.
 
ही लसीकरण मोहीम शहरातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांमध्ये  राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेची अमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शासकीय आणि खासगी शाळांत पालकसभा घेण्यात येत आहे. घुटकाला येथील रफी अहमद किडवाई स्कुल आणि लोकमान्य टिळक विद्यालय येथे आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. व्यंकट पंगा, डॉ. अभिजित संकारी, डॉ. सोनाली कपूर, डॉ. राम भारत, डॉ. सुवर्णा सोनडवले, डॉ. पियुष मुत्यालवार यांनी  बैठकांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केले.