सामुदायिक विवाह सोहळा समिती गठीतीकरिता धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा

सामुदायिक विवाह सोहळा समिती गठीतीकरिता धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा

भंडारा, दि. 15 : धर्मादाय आयुक्त यांच्या वतीने जिल्ह्यातील आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या इसमांची मुले, बेघर, पारधी समाज, गरीब, गरजू, उसतोड कामगार, भटक्या जमाती, विमुक्त जाती, अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले/ मुली इत्यादींचे विवाह सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या मार्फत दि. 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मे 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती ही समिती गठीत करण्याकरिता जिल्ह्यातील धर्मादाय संस्था/न्यास यांचे विश्र्वस्त व वकील यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वासुदेव बाळारामजी वाघमारे यांची इमारत, राजगोपालाचारी वार्ड, मिस्कीन टँक, महाल रोड, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. समिती गठीत झाल्यानंतर गरीब, गरजू मुला/मुलींचे विवाह या समिती मार्फत करण्यात येईल.