भंडारा : अंतिम मतदार यादी निरीक्षणासाठी तहसील कार्यालयात उपलब्ध

अंतिम मतदार यादी निरीक्षणासाठी तहसील कार्यालयात उपलब्ध

भंडारा, दि. 24 : भंडारा जिल्हा परिषद व भंडारा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी तयार असल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील 13 नुसार प्रारूप मतदार यादी यासंबंधीच्या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून भंडारा जिल्हा परिषद व भंडारा पंचायत समितीची अंतिम मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनार्थ व निरीक्षणासाठी तहसील कार्यालय भंडारा येथे उपलब्ध आहे, असे तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी अरविंद हिंगे यांनी कळवले आहे.