दिव्यांगाना मिळणार विविध दाखले साकोली येथे शिबिराचे आयोजन

दिव्यांगाना मिळणार विविध दाखले साकोली येथे शिबिराचे आयोजन

 

भंडारा, दि. 5 : तहसील कार्यालय, साकोली येथे शासन आपल्या दारी उपक्रमात उद्या दि. 6 जून रोजी शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड काढण्याकरीता तसेच दिव्यांगांकरिता विविध दाखले वितरीत करण्यात येतील. तसेच आरोग्य तपासणी देखील करण्यात येईल. तरी गरजू लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी तहसीलदार अनिता गावंडे यांनी केले आहे.