अनोळखी, बेवारस रूग्ण महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

अनोळखी, बेवारस रूग्ण महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील वार्ड नं. 17 मध्ये दि. 28 ऑक्टोंबर 2021 रोजी 28 वर्षीय अनोळखी, बेवारस रुग्ण महिलेला भरती करण्यात आले आहे.  रुग्णाचा नोंदणी क्रमांक 41219 व एमएलसी क्रमांक 12184 आहे. सदर महिला रुग्णासोबत कोणीही नातेवाईक अथवा परिचित व्यक्ती नसून रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. तरी,सदर महिला रुग्णांचे नातेवाईक अथवा परिचित असणाऱ्या व्यक्तींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील वार्ड नं. 17 येथे संपर्क साधावा. असे आवाहन चंद्रपूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे.