कचरा टाकणाऱ्या जागेवर केले जात आहे योगनृत्य

कचरा टाकणाऱ्या जागेवर केले जात आहे योगनृत्य

राजीव गांधी उद्यान पठाणपुरा योग नृत्य परिवारातर्फे स्वच्छतेचा संदेश

चंद्रपूर ७ नोव्हेंबर – पठाणपुरा दरवाजाबाहेरील कचरा टाकल्या जाणाऱ्या जागेचे रूपांतर स्वच्छ परिसरात झाले असुन आता त्या जागेवर योगनृत्य परिवारातर्फे रोज सकाळी नृत्याद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेअंतर्गत, माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्या नेतृत्वात राजीव गांधी उद्यान पठाणपुरा योग नृत्य परिवारातर्फे स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे. स्वच्छता मोहीमेअंतर्गत पठाणपुरा गेटच्या बाहेर किल्याला लागून उजव्या बाजूला असलेल्या सिमेंट रोडवर कचरा टाकण्याची जागा असल्याचे आढळुन आले. या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडुन सदर जागेवर कचरा टाकला जात असल्याने अस्वच्छतेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

राजीव गांधी उद्यान पठाणपुरा योग नृत्य परिवारद्वारे ५ तारखेपासुन सतत ३ दिवस या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. लागुनच असलेला छोटा नाला जो बुजला होता त्यातील गाळ स्वच्छ केल्याने आता त्यातुन आता पाणी योग्य तऱ्हेनं वाहते आहे. तसेच किल्याची भिंत परिसरातील झाडे झुडपे, वेल काढुन स्वच्छता करण्यात येत आहे. जो परिसर स्वच्छ केला आहे तिथे पुन्हा कचरा टाकला जाऊ नये या उद्देशाने राजीव गांधी उद्यान पठाणपुरा योग नृत्य परिवारातर्फे योगनृत्य करून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे.

याप्रसंगी बंडू देवोजवार, वक्रार काझी,सागर यादव, किरण टिपले, सागर श्रीरामे, पवन पुस्टोदे, प्रकाश चहारे,रंजना चौधरी,त्रिवेणी चव्हाण, प्रियांका मोगरे, सीमा मोगरे,अस्मिता नायवाडे,सपना रोहनकर व मोठ्या संख्येने योगनृत्य परिवाराचे सदस्य उपस्थीत होते.