उमेदवारांनी पदभरती प्रक्रीयेसंदर्भात दलाल व एजंटपासून सावध राहावे -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

उमेदवारांनी पदभरती प्रक्रीयेसंदर्भात दलाल व एजंटपासून सावध राहावे

-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर : ग्राम विकास विभागांतर्गत, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गट -क संवर्गातील पदभरती शासन स्तरावरुन राबविण्यात येत आहे. हि पदभरती नि:पक्षपाती व पारदर्शकपणे होण्यासाठी तसेच परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता परिक्षेसंदर्भात काही दलाल व एजंटकडुन उमेदवाराची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, उमेदवारांनी अशा दलाल व एजंट पासून सावध राहावे.

यासंदर्भात काही तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील दुरध्वनी क्र. 07172-255400, जिल्हा परिषद, दुरध्वनी क्र. 7172-256401, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, दुरध्वनी क्र. 07172-250251, 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा कार्यालयाच्या संकेतस्थळावरील दुरध्वनी क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी. असे आवाहन  जिल्हा निवड समिती, अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.