मुंबई : ‘बसपा’च्या वैचारिक चळवळीला वार्ड, प्रभागनिहाय बळ द्या ! राष्ट्रीय महासचिव, माजी मंत्री धर्मवीर सिंह अशोक यांचे आवाहन ठाण्यात ‘महापौर बनाओ अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बसपाच्या वैचारिक चळवळीला वार्डप्रभागनिहाय बळ द्या !
राष्ट्रीय महासचिवमाजी मंत्री धर्मवीर सिंह अशोक यांचे आवाहन
ठाण्यात महापौर बना अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२१

तळागाळातील शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बहुजन समाज पार्टी सदैव कार्यरत आहे. या समाजहितकारक कार्याला अधिक वेग देण्यासाठी वॉर्ड आणि प्रभागात बसपाच्या वैचारिकतेला बळ द्यावे, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय महासचिव, माजी मंत्री मा.धर्मवीर सिंह अशोक साहेब यांनी केले. ठाणे शहरात नुकत्याच आयोजित ‘महापौर बनाओ अभियान’ कार्यक्रमातून त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांना संबोधित केले. यावेळी प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब आणि प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना धर्मवीर सिंह अशोक म्हणाले की, समाजकारणासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे.यासाठी पार्टीच्या वैचारिक भूमिकेशी बांधिलकी ठेऊन सर्व कार्यकर्त्यांनी शहरात पक्षाचा महापौर आरुढ करण्यासाठी प्रयत्नरत राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी कॅडरला दिले. जोपर्यंत सर्वजण हितकारक सरकार ठाणे महानगर पालिकेत सत्तेवर येणार नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांचा उद्धार होणार नाही, म्हणून ठाणेकरांनी पालिकेच्या चाव्या बसपाच्या हाती सोपवाव्यात, असे आवाहन धर्मवीर सिंह यांनी मतदारांना केले.

पीडित, उपेक्षित, शोषित समाजातून येणाऱ्या प्रतिनिधित्वला शहराचा महापौर बनवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा आणि या सकारात्मक शक्तीने झपाटल्यासारखे कामाला लागावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केले.राज्यात होऊ घातलेल्या आगामी निवडणुकांमध्ये बसपाची विजयी घौडदौड प्रस्थापित राजकीय पक्षांना बघायला मिळेल. तथाकथितांच्या राजकीय मक्तेदारीला आव्हान देण्याचे काम त्यामुळे बसपा करणार असल्याचे अँड.ताजने म्हणाले. शहरातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना त्यामुळे अहोरात्र मेहनत घ्यावी लागेल. याच मेहनतीच्या बळावर बसपा ठाण्यात किंगमेकर होईल, असा विश्वास अँड.ताजने यांनी व्यक्त केला.

बसपा प्रमुख मा.बहन मायावती जी यांच्या निर्देशांनूसार पार्टीत तरूण आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात देखील बहनजींच्या निर्देशांचे पालन करण्यात येईल.पक्षाचे काम इमानेइतबार करणार्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना म्हणाले. उत्तर प्रदेशात यंदा पाचव्यांदा बहज मायावती जींच्या नेतृत्वात बसपाचे सरकार आरूढ होणार आहे. महाराष्ट्रात देखील बसपाचे विजयी अश्व चौखुर उधळतील, असा विश्वास रैना यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव अँड.अमोल कांबळे, सुदाम गंगावणे, प्रदेश सदस्य विद्याधर किरतावडे, अप्पाराव थोटे, जिल्हा अध्यक्ष संतोष भालेराव, उपाध्यक्ष दामोदर काकडे,शहर अध्यक्ष नागेश जाधव तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.