साकोली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारुप मतदार याद्या अवलोकनार्थ प्रसिध्द

साकोली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या

पोटनिवडणुकांसाठी प्रारुप मतदार याद्या अवलोकनार्थ प्रसिध्द

भंडारा, दि. 12 : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये साकोली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत केसलवाडा प्रभाग क्र. 3, वडेगाव प्रभाग क्र. 1, परसोडी प्रभाग क्र. 3 व 4, विहिरगाव प्रभाग क्र. 1, कुंभली प्रभाग क्र. 3, खंडाळा प्रभाग क्र. 3, सासरा प्रभाग क्रमांक 3 व 4, जांभळी/खांबा प्रभाग क्र. 1 व 2, सानगडी प्रभाग क्र. 2, बोदरा प्रभाग क्र. 1 या ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या व सूचना संबंधित ग्रामपंचायतीचे सूचना फलकावर, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, पंचायत समिती व तहसिल कार्यालय येथील सूचना फलकावर सर्व नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीवर नागरिकांचे आक्षेप, हरकती व सूचना असल्यास तहसील कार्यालय, साकोली येथे निवडणूक विभागात 12 ते 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. 16 नोव्हेंबर 2021 नंतर सादर केलेल्या आक्षेप, हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे निवडणूक अधिकारी (ग्रापंनि) तथा तहसीलदार साकोली यांनी कळविले आहे.