12 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीची आरक्षण सोडत

12 नोव्हेंबर रोजी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीची आरक्षण सोडत

चंद्रपूर दि. 11 नोव्हेंबर :येत्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीने सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीस जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.
सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीसाठी चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार  दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती, सिंदेवाही येथील सभागृहात सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येईल.
तरी,वरील प्रमाणे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्यावेळी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.