मंडणगड येथे दिवाणी न्यायालय

मंडणगड येथे दिवाणी न्यायालय

 

            रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे ग्राम न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायालय, कनिष्ठस्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या न्यायालयासाठी 7 नियमित पदे निर्माण करण्यास आणि 4 पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली.  यासाठी 71 लाख 76 हजार 340 इतका वार्षिक खर्च येईल.