आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत अर्ज आमंत्रित

आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत अर्ज आमंत्रित

भंडारा, दि. 11 : आरोग्य यंत्रणेवरील आलेला अतिरिक्त ताण लक्षात घेवून आगामी काळात प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत आरोग्य क्षेत्रातील विविध कोर्सेसमध्ये मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये होणार असून जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक – युवतींनी सदर प्रशिक्षण योजनेकरीता https://forms.gle/dSpeWxnBZBWL3BpWA या गुगल लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत होणारे प्रशिक्षण दररोज किमान 6 तास याप्रमाणे साधारण 35 दिवसांचे असून ते पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना 90 दिवस (प्रती दिवस 8 तास) हॉस्पिटलमध्ये ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ आहे. अभ्यासक्रमात नमुद केल्यानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवार भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असावा. सदर अर्ज हा नोंदणीसाठी असून प्रवेश निश्चिती नाही. प्रवेश हा समुपदेशन, मुलाखत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याव्दारे करण्यात येईल. अधिक माहितीकरीता दूरध्वनी क्रमांक 07184-252250 वर संपर्क साधावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.