महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या बीजभांडवल योजनेतून उभारली किराणा शॉपी

बीजभांडवल योजनेतून उभारली किराणा शॉपी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या

बीजभांडवल योजनेचा घेतला रमणकुमारनी लाभ

हाताला काम नाही, अनेकदा अल्पशा पगाराच्या नौकरीत काम करून राहणाऱ्या तरुण -तरुणींसाठी रमणकुमार राजविलास गजभिये यांचा आदर्श आहेत. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या बीजभांडवल योजनेतून किराणा दुकान टाकले. महामंडळाद्वारे विविध रोजगारासाठी कर्ज देण्यात येते याची माहिती श्री. गजभिये यांना होती. कागदपत्रासह अर्ज केल्यानंतर 31 मार्च 2021 रोजी बँक ऑफ इंडिया, शहापूर बँकेद्वारे 4 लाख 40 हजार रूपये कर्जवाटप करण्यात आले. त्यामध्ये महामंडळाचे 78 हजार रूपये बीजभांडवल कर्ज देण्यात आले. लाभार्थीचे स्थळपाहणी केली असता लाभार्थीचा किराणा सुपर शॉपीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले.

महामंडळाद्वारे देण्यात आलेल्या कर्जाचा लाभार्थ्याने उत्तम प्रकारे लाभ घेतला असून त्यामध्ये स्वतःचे भांडवल गुंतवून मोठी सुपर शॉपी तयार केली आहे. महामंडळाच्या कर्जामुळे लाभार्थीचे वार्षिक उत्पन्नात वाढ झाली असून वार्षिक 5 ते 6 लाख रूपये इतकी उत्पन्नात वाढ झाली असल्याचे लाभार्थ्याने सांगितले. कर्जवाटपानंतर दरमहा रूपये 1 हजार 500 रूपये नियमितपणे वसुली भरणा करीत आहे.

रमणकुमार गजभिये म्हणाले की, अशाप्रकारे महामंडळाचे कर्ज मिळाल्यामुळे माझी आर्थिक स्थिती आधीपेक्षा सुधारली आहे. मी कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तमप्रकारे करू शकतो. मी माझ्या शॉपीमध्ये दोन लोकांना पूर्णवेळ रोजगार दिला आहे. 600 चौ. फुट क्षेत्रात मी किराणा शॉपीची उभारणी केली असून त्यामध्ये 15 लाख रूपये पेक्षा जास्त रक्कमेचा माल सध्या आहे. मी महामंडळाची परतफेडही नियमितपणे करीत आहे व यापुढेही नियमित कर्ज परतफेड करत राहील. तसेच सुलभ कर्जप्रक्रियेद्वारे कर्ज मिळवून दिल्याबद्दल मी महामंडळाचे आभार मानतो.