मॉईल लिमीटेड चिखला माईन येथे रोजगाराची संधी

मॉईल लिमीटेड चिखला माईन येथे रोजगाराची संधी

 

भंडारा दि. 3 : जिल्हयातील मॉईल लिमीटेड चिखला माईन, चिखला या आस्थापनेने पुरूष व महिलांसाठी ॲप्रेटीसची रिक्तपदे नॅशनल ॲप्रेटीसशीप या पोर्टलवर 48 रिक्तपदे अधिसुचित केलेली आहेत.

 

इच्छुक व पात्र उमेदवार युवक व युवतींनी NAPS या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. पदांकरीता मुलाखत / कागदपत्रे पडताळणीद्वारे गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मॉईल लिमीटेड चिखला माईन येथे नियुक्ती देण्यात येणार आहे. ॲप्रेटीसशीप कायदानुसार निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. काही अडचण असल्यास विवेक महाकालकर यांच्याशी 8989801556 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सुधाकर झळके यांनी केले आहे.