12 नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत Ø आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

12 नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीची आरक्षण सोडत

Ø आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

चंद्रपूर दि. 10 नोव्हेंबर : जिल्ह्यातील सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी ,कोरपना व जिवती नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा धरून आरक्षणाच्या एकूण जागा 50 टक्केच्या वर जात असल्यामुळे या 5 नगरपंचायतीमध्ये प्रभागातील नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूकीचे आदेश जारी केले आहे.

सावली नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी मुल, पोंभुर्णासाठी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, गोंडपिंपरीसाठी उपविभागीय अधिकारी गोंडपिंपरी, कोरपनासाठी उपविभागीय अधिकारी राजुरा, आणि जिवतीसाठी उपविभागीय अधिकारी चंद्रपूर हे आरक्षण सोडती करीता नेमणूक करण्यात आलेले पीठासीन अधिकारी आहेत. आरक्षण सोडत शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता संबंधित नगरपंचायत कार्यालयात होणार आहे.

तरी, वरीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्यावेळी नगरपंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.