21 ऑक्टोबर रोजीचे तृतीयपंथी व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी कॅम्प स्थगित

21 ऑक्टोबर रोजीचे तृतीयपंथी व्यक्तीचे

वैद्यकीय तपासणी कॅम्प स्थगित

चंद्रपूर दि.19 ऑक्टोबर : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना केंद्र शासनाच्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य विभाग, चंद्रपूर यांच्याकडून दि. 21 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी कॅम्प सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्यायभवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. परंतु हा कॅम्प काही अपरिहार्य व तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. तरी तृतीयपंथीय व्यक्तींनी याबाबतची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तथा समाज कल्याण, विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.