हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता विदर्भाच्या संघात चंद्रपुर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड

हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता विदर्भाच्या संघात चंद्रपुर जिल्ह्यातील खेळाडूंची निवड

 

चंद्रपुर : चंद्रपुर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपुर जिल्ह्यातील खेळाडूंची सुन्दर नगर हिमाचल प्रदेश येथे दिनांक ०५ ते ०७ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय सिनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली आहे. विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, नागपुर ( वि.टि.बी.सी.ए.) नी सुन्दर नगर हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय सिनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता मुले व मुलींचा विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचा संघ दिनांक ०२ ऑगस्ट  २०२३ रोजी जाहिर केला. सदर विदर्भाच्या सिनिअर मुलाच्या संघात कु. अंकित दिलीप चलाख तर सिनिअर मुलींच्या संघात कु. सरोजीनी हरिदास इड्डे, कु. सानिया बंडू कोंगरे व कु. अस्मिता नविन वाघमारे इ. खेळाडूंची निवड झालेली आहे. निवड झालेला संघ ०३ ऑगस्ट रोजी नागपुर वरुन सुन्दर नगर हिमाचल प्रदेशसाठी रवाना झालेला आहे. नागपुर येथे दिनांक १७ ते १९ जून २०२३ रोजी पार पडलेल्या २२ वी राज्यस्तरीय सीनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करून अखिल भारतीय सिनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात आपले स्थान प्राप्त केले.  विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झालेल्या खेळाडुंचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सदर खेळाडूंना प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून चंद्रपुर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपुरचे  सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या प्रशिक्षणात व वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आज पर्यंत अनेक खेळाडुंना यश व प्राविण्य प्राप्त झाले.

            सदर खेळाडूंच्या यशाबद्दल चंद्रपुर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपुरचे अध्यक्ष मा. डॉ. अनिस अहमद खान, उपाध्यक्ष डॉ. महेशचंद शर्मा , श्री. बाबा भाऊ आगलावे, सचिव प्रा .विक्की तुळशीराम पेटकर, सहसचिव श्री. सूरज परसुटकर, श्री. बंडू डोहे, कोषाध्यक्ष कु. रुचिता आंबेकर, सहकोषाध्यक्ष कु. पूर्वा खेरकर, सल्लागार श्री. विश्वास इटनकर, सदस्य निखिल पोटदुखे, इखलाक पठान, इंद्रजीत निषाद, हर्षल क्षिरसागर, राकेश ठावरी, नरेश चंदेल, मनोज डे, रिंकेश ठाकरे यांनी यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले .