सोमवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोमवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

भंडारा, दि.23 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाविद्यालय, खापरी रोड, पवनी येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्याच्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तयांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मेगा जॉब फेअर भंडारा -6 येथे रिक्त पदे अधिसूचीत करावे. तसेच नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम पेजवर जावून नोंदणी करावी. तसेच 27 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल यांच्याशी 07184-252250 तसेच 7620378924 यावर संपर्क साधावा.