जिल्हाधिकाऱ्यांनी केली आधारभूत धान खरेदी केंद्राची पाहणी

????????????????????????????????????

जिल्हाधिकाऱ्यांनी केली आधारभूत धान खरेदी केंद्राची पाहणी

भंडारा, दि. 3 : जिल्ह्यात आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची धान खरेदी सुरू आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या भंडारा, पवनी, लाखांदूर तालुक्यातील धान खरेदी केंद्र व राईस मिलला आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भंडारा आकाश अवतारे, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, जिल्हा पणन अधिकारी भारत पाटील, एनईएमएल कंपनीचे प्रतिनिधी मयुर खोब्रागडे उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी धान खरेदी केंद्रावरील वजन काटा, चुकारा रजिस्टर, गोदाम, धानाची आर्द्रता मिटरने मोजून पाहणी केली तसेच खरेदी केंद्रावरील बारदाना उपलब्धते विषयी माहिती जाणून घेतली. गोदामाच्या क्षमतेनुसार धान खरेदी केंद्रांना उद्दिष्ट देण्याचे त्यांनी यावेळी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना सांगितले.

धान खरेदी केंद्र भेटी दरम्यान ऑनलाइन नोंदणी करतांना काही अडचणी आल्या का याबाबत जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्यांबाबत माहिती जाणून घेतली. शेतकरी नोंदणी व धान खरेदी मधील अडचणी सोडविण्याबाबत जिल्हा पणन अधिकारी तसेच खरेदी केंद्राचे पदाधिकारी यांना निर्देश दिले. चालू हंगामात शासनाने धान भरडाईसाठी एफआरके पद्धत अनिवार्य केल्याने मुंडले राईस मिल विरली, सूचित राईस मिल पहेला, पवनपुत्र राईस मिलआसगाव येथे भेट देऊन राईस मिलला भेट देऊन ब्लेंडिंग मशिन आणि धान भरडाईच्या संपूर्ण पध्दतीची माहिती जाणून घेतली.