शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी 23 ऑक्टोबरला महाशिबिर

शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी 23 ऑक्टोबरला महाशिबिर

भंडारा,दि.20:- ग्रामीण व शहरी भागातील गरीब व दुर्बल घटकातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्ह्यातील शासकीय कार्यालये यांचे संयुक्त विद्यमाने जे. एम. पटेल कॉलेज परिसर भंडारा येथे 23 ऑक्टोबर 2021 रोजी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 07184-256466 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.