डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2023-24

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2023-24

गडचिरोली, दि.05: राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण सन 2023-24 ही योजना शासन निर्णयान्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे, दि.30 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.

प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुतर्ता करवुन अंतिमरित्या सदर योजनेअंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. दि. 30 जुन 2023 नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.