उंचावतोय मनपा शाळांचा दर्जा चंद्रपूर महापालिकेत साजरा झाला शिक्षक दिन

उंचावतोय मनपा शाळांचा दर्जा चंद्रपूर महापालिकेत साजरा झाला शिक्षक दिन

चंद्रपूर ५ सप्टेंबर – शिक्षक दिनानिमित्त आयुक्त राजेश मोहीते यांच्या हस्ते मनपा शाळेतील गुणवंत शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक,गुणवंत विद्यार्थी तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा सत्कार ५ सप्टेंबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आला.

मनपा शिक्षण विभागातर्फे आयोजीत या कार्यक्रमात अनेक वर्षे आपली सेवा देणारे शिक्षक – लता शशिकांत मालुसरे,कल्पना मधुकर साखरकर,आरिफा सुलताना सलीम खान,प्रभा चंदु बेले, सध्या कार्यरत असलेले गुणवंत शिक्षक – रवींद्र गोरे, मधुकर मडावी, इंदू अंडेलकर, विजयालक्ष्मी कुंडले, इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के देणाऱ्या शाळांचे शिक्षक – सौ. छाया कुराणकर व एमएनएस सरस्वती तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत १५ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात परीश्रम घेणारे शिक्षक – अरुण वलके यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त राजेश मोहीते म्हणाले की, आज मनपा शाळांत दिले जाणारे शिक्षण व सुविधा यांचा दर्जा चांगला आहे मात्र आधी ही स्थिती नव्हती, खाजगी शाळेच्या तुलनेत विशेष सुविधा नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली होती. आपल्या शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्व समजाविले. शाळांमध्ये ई – लर्निंगसाठी अत्याधुनिक संगणक व प्रोजेक्टर्स, रंगरंगोटी, चित्र सजावट, डेस्क बेंचेस, वॉटर कूलर्स, गणवेश इत्यादी खाजगी शाळांसारख्या सुविधा टप्याटप्याने देण्यात आल्या.

बदल हा घडला की, २०१५ मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या २ हजार २७० विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ७० वर पोहचली आहे. आता तर एप्रिल महिन्यातच प्रवेश बंदची पाटी लावावी लागते ही एक सक्सेस स्टोरीच आहे. मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत व शिक्षकगण यांनी घेतलेले प्रयत्न आणि मनपा प्रशासनाने दिलेल्या प्रोत्साहनाने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यास मदत होत आहे.

याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चाफले मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत उपस्थित होते.