स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पॅन इंडिया जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

पॅन इंडिया जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन

भंडारा, दि.05:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व  उच्च न्यायालय मुंबई याच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्फेत 02 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत पॅन इंडिया जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेदरम्यान कायदेविषयक तसेच शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महोत्सव यात्रेचे उद्घाटन 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एस. खुणे यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर मोफत विधी सेवाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्याकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली जिल्हा न्यायालय ते गांधी चौक भंडारा पर्यंत करण्यात आली होती.
या रॅली मध्ये प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी. एस.खुणे, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनिता शर्मा, दिवाणी न्यायाधीश एम.ए.कोठारी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एच.कर्वे, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर.एस.भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. पी. भोसले, जलदगती न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश पी.पी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश आर.पी.थोरे, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.ए. पटेल, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती चेतना नेवारे, भंडारा वकील संघाचे अध्यक्ष आर. बी. वाढई तसेच शासकीय विभागाचे अधिकारी, अधिवक्तागण, लायन्स क्लबचे  सदस्य व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
रॅलीनंतर इंद्रराज सभागृह भंडारा येथे जिल्हा‍ विधी सेवा प्राधिकरण व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महात्मा गांधीजीची संकल्पना सर्वांना समतापूर्ण न्याय अशी असून सर्व सामान्य नागरिकांना तो गरीब असो वा कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला समान न्याय मिळायला पाहीजे असे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी. एस.खुणे यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी 02 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत पॅन इंडिया जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेदरम्यान कायदेविषयक तसेच शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले. रॅलीत सहभागी झालेल्या जिल्हा न्यायालय भंडारातील सर्व न्यायाधीश, सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, अधिवक्तागण, लायन्स क्लबचे सदस्य तसेच कर्मचारी यांचे आभार मानले.