स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज पॅन इंडिया जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

आज पॅन इंडिया जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन

  • मोफत विधी सेवा विषयावर रॅली

भंडारा,दि.01:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 02 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 पर्यंत पॅन इंडिया जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहीमे दरम्यान कायदेविषयक तसेच शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर मोहिमेचे उद्घाटन 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा येथे होणार आहे तसेच उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हा न्यायालय ते गांधी चौक भंडारा पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी कळविले आहे.