स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तलाठ्यांमार्फत मिळणार घरपोच 7/12

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

तलाठ्यांमार्फत मिळणार घरपोच 7/12

  • आज ऑक्टोबर पासून मोहिमेस सुरुवात

       भंडारा,दि.01:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक खातेदारास तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन मोफत 7/12 देण्याच्या उद्देशाने 2 ऑक्टोबर 2021 पासून विशेष मोहीम तुमसर तालुक्यात राबविण्यात येणार असून तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन तुमसर तहसीलदार यांनी केले आहे.
         स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमीत्त डिजीटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसीत करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.7/12 अद्ययावत उताऱ्याची प्रत एक वेळा मोफत तुमसर तालुक्यात संबंधीत तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन मोफत उपलब्ध करुन देणेबाबतची मोहीम 2 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात येणार आहे. तसेच ज्या तलाठ्याकडे एकापेक्षा अधिक अधिक महसूली गावे असल्यास पुढील दिवशी 7/12 वितरीत करण्यात येतील.असे तहसीलदार तुमसर यांनी कळविले आहे.